Maharashtra Politics । ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांचा तिढा कायम आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या प्रचार सभेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest marathi news)

Sharad Pawar । सूनेबद्दल शरद पवारांचे ‘ते’ वक्तव्य अन् पेटली नव्या वादाची ठिणगी

काही दिवसांपूर्वी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावांचा समावेश होता. पण आता भाजपने (BJP) स्टार प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव वगळले आहे. यामुळे आता संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे.

Viral News । 14 वर्षाच्या मुलाने गिळले नाणे, त्याची अवस्था पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

स्टार प्रचारकांच्या नावांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप करत भाजपविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. भाजपने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे या तक्रारीत म्हटलं होतं. पण आता निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेण्यापूर्वी भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवलं आहे.

Crime News । सोशल मीडियावरची मैत्री पडली महागात! हॉटेलमध्ये नेत तरुणीवर….

Spread the love