Loksabha election । ठाकरे गटाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच बड्या नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा

Loksabha election

Loksabha election । छत्रपती संभाजीनगर : आजपासून लोकसभेच्या मतदानाला (Loksabha election 2024) सुरुवात झाली आहे. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान,अनेक नेते पक्षाने तिकीट नाकारल्याने पक्षांतर करत आहेत. अशातच लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Ajit Pawar । अजित पवारांना निवडणूक आयोगाचा मोठा दणका, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी होणार चौकशी

महाविकास आघाडीला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यापैकी एक उमेदवार ठरवायचा होता. पण त्यांनी चंद्रकांत खैरे यांची लोकसभेसाठी निवड केली. असे असले तरी चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटालाच धक्का दिला आहे. चंद्रकांत खैरे यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे.

Sharad Pawar । शरद पवारांनी रात्रीत बदलली समीकरण, ‘हा’ बडा नेता हाती घेणार तुतारी

“मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असून 2029 ची निवडणूक मी लढवणार नाही. 2029 ची निवडणूक पक्ष देईल तोच उमेदवार किंवा अंबादस दानवे यांनी निवडणूक लढवावी. विरोधक काय करत आहेत. त्याकडे आमचं लक्ष लागल आहे. महागाई खूप वाढली आहे. तसेच बरोजगारी देखील वाढली आहे. त्यांचं लक्ष जनतेकडे नाही,” असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Crime News । धक्कादायक! मैत्रिणीच्या भावानेच केला घात, गुंगीचं औषध देऊन….

Spread the love