Ajit Pawar । अजित पवारांना निवडणूक आयोगाचा मोठा दणका, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी होणार चौकशी

Ajit Pawar

Ajit Pawar । बारामती मतदारसंघात यंदा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे (Sunetra Pawar Vs Supriya Sule) अशी लढत पार पडणार आहे. कालच या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. पण आता अजित पवारांना चांगलाच धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । शरद पवारांनी रात्रीत बदलली समीकरण, ‘हा’ बडा नेता हाती घेणार तुतारी

नुकत्याच घेतलेल्या इंदापूरच्या सभेत अजित पवारांनी “तुम्हाला काय लागेल तो निधी आम्ही द्यायला सहकार्य करू. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतोय तशी आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकचा बटणं दाबा. म्हणजे आम्हाला निधी द्यायला बरं वाटेल,” असं वक्तव्य केले होते. या वक्तव्याची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

Crime News । धक्कादायक! मैत्रिणीच्या भावानेच केला घात, गुंगीचं औषध देऊन….

या वक्तव्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commissions) चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात यावी, अशी मागणी केली होती.

Dhairyashil Mohite Patil । लोकसभेपूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का

Spread the love