
Ssc Result । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. संपूर्ण राज्याचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, एकूण १५ लाख ३९ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९६.१४ इतकी असून, मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुली ३.८३ टक्क्यांनी पुढे आहेत.
India Pakistan War । सर्वात मोठी बातमी! भारतीय सीमेच्या दिशेने सरकत आहे पाकिस्तानी आर्मी, अलर्ट जारी
कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची नोंद करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल तुलनेने सर्वात कमी आहे. यंदा ६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती, त्यापैकी २४ विषयांमध्ये १०० टक्के निकाल लागले आहेत, हे शिक्षणाच्या दृष्टीने एक सकारात्मक संकेत मानला जात आहे.
विशेष प्राविण्य श्रेणीत, म्हणजेच ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ८८ हजारांपेक्षा अधिक आहे. तर ६० ते ७५ टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ५ लाख इतकी आहे. दुसऱ्या श्रेणीत (४५ ते ६० टक्के) सुमारे ३.६० लाख विद्यार्थी तर तिसऱ्या श्रेणीत (३५ ते ४५ टक्के) १.०८ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी दहावीच्या परीक्षेत २११ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ११३ विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. पुणे (१३), संभाजीनगर (४०), कोल्हापूर (१२), मुंबई (८) आणि इतर विभागांतूनही काही विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
Hsc Result । मोठी बातमी! बारावीचा निकाल जाहीर; ‘या’ विभागाने मारली बाजी