Havaman Andaj । सावधान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा; ‘या’ ठिकाणी अलर्ट जारी

Havaman Andaj

Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात हवामानात मोठे बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या देखील हवामान विभागाने पावसाबाब मोठी अपडेट दिली आहे.

Ssc Result । दहावीचा निकाल जाहीर! पुन्हा मुलींची आघाडी; राज्यभरात ९४.१० टक्के यश

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह राज्यातील अनेक भागांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

India Pakistan War । सर्वात मोठी बातमी! भारतीय सीमेच्या दिशेने सरकत आहे पाकिस्तानी आर्मी, अलर्ट जारी

या’ जिल्ह्यांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सोलापूर (Solapur) या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी देखील आज आणि उद्या अलर्ट जारी करण्यात आला आहे.

India-Pakistan War । बलुचिस्तानमधून पाकिस्तानवर मोठा हल्ला: बलुच आर्मीने घेतला पोलिस चौकांचा ताबा, गॅस पाईपलाइनही फोडली!

Spread the love