Lok Sabha Election । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची होणार घरवापसी

Lok Sabha Election । देशभरात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ठिकठिकाणी राजकीय नेतेमंडळी प्रचारसभा घेताना दिसत आहेत. अनेक नेते पक्षाने उमेदवारी नाकारल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. याचा निवडणुकीवर परिणाम होईल. अशातच निवडणुकीपूर्वी भाजपला (BJP) सर्वात मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Nora Fatehi | अभिनेत्री नोरा फतेहीच धक्कादायक वक्तव्य; म्हणाली, ते माझ्या बॅाडी पार्ट्सवर…’

काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेले ठाकरे गटाचे बडे नेते घरवापसी करणार आहेत. धाराशिवचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव बापू कांबळे (Shivajirao Bapu Kamble) यांचा ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांचा लवकरच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थित पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Eknath Shinde । मुख्यमंत्री शिंदे यांनी मुस्लिमांबाबत केले मोठे वक्तव्य

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कैलास पाटील (Kailas Patil) यांच्या नेतृत्वात शिवाजीराव कांबळे यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. आज भोकर येथे उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद होणार असून यावेळी शिवाजीराव बापू कांबळे यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होईल. निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Shikhar Bank Scam Update । ब्रेकिंग! शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवारांना EOW कडून क्लीन चीट

Spread the love