Shikhar Bank Scam Update । ब्रेकिंग! शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवारांना EOW कडून क्लीन चीट

Sunetra Pawar

Shikhar Bank Scam Update । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. EOW कडून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, अजित पवार यांच्याबरोबरच EOW ने शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांना देखील क्लोजर रिपोर्टमध्ये क्लीन चिट देण्यात आली आहे.

Sharad Pawar । बड्या नेत्याने शरद पवारांना सुनावले; केली जोरदार टीका

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये पहिला क्लोजर रिपोर्ट सादर झाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर याप्रकरणी पुन्हा तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर आता EWO ने क्लोजर रिपोर्ट सादर करत अजित पवारांसह सुनेत्रा पवारांना क्लीन चीन दिली आहे.

Abu Azmi । अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांवर अबू आझमी यांचे सर्वात मोठे वक्तव्य

नेमका काय आहे शिखर बँक घोटाळा?

2001 ते 2011 या काळात शिखर बँकेनं राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांना काहीच तारण न देता कर्ज दिलं होत. दरम्यान आघाडी सरकारच्या काळात या कर्जवाटप प्रकरणी कर्जवसुली चुकवली, असा आरोप करण्यात आला होता. इतकंच नाही तर अजित पवार यांचे जवळचे मानले जाणारे माणिकराव पाटील हे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना ही कर्ज देण्यात आले असल्याचादेखील आरोप करण्यात आला होता. हा शिखर बँक घोटाळा तब्बल 2 हजार 61 कोटी रुपयांचा होता. तसेच या घोटाळ्यात सरकारी तिजोरीला 25 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. या शिखर बँकेकडून नेत्यांनी स्वतःच्या संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत फायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला.

Mumbai Crime । नूडल्सच्या पॅकेटमध्ये हिरे, अंडरवेअरमध्ये सोने… मुंबई विमानतळावर 4 तस्कर पकडले

Spread the love