Nora Fatehi | अभिनेत्री नोरा फतेहीच धक्कादायक वक्तव्य; म्हणाली, ते माझ्या बॅाडी पार्ट्सवर…’

Nora Fatehi

Nora Fatehi | सेलिब्रिटींसाठी, लोकांच्या नजरेत राहणे कठीण आहे, ते त्यांच्या घरातून बाहेर पडताच कॅमेरे त्यांचे अनुसरण करतात. पापाराझी संस्कृती रूढ झाल्यामुळे, सेलिब्रिटींसाठी त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे अधिक कठीण होत आहे, विशेषत: जर तुम्ही महिला सेलिब्रिटी असाल. शरीराचे अवयव उघड करणारी छायाचित्रे आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतात.

Eknath Shinde । मुख्यमंत्री शिंदे यांनी मुस्लिमांबाबत केले मोठे वक्तव्य

इंटरनेटवर सतत टीका होत असलेल्या आणि अनेकदा ट्रोल झालेल्या नोरा फतेहीने मीडिया आणि पापाराझींकडून महिला सेलिब्रिटींच्या ‘ऑब्जेक्टिफिकेशन’बद्दल खुलासा केला आहे. नोरा फतेही म्हणाली, “पापाराझी शरीराच्या दुसऱ्या भागांवर देखील झूम करतात. त्यामुळे कधी कधी असं वाटतं, त्यांच्याकडे झूम करण्यासाठी दुसरं काहीही नाही. मात्र, पापाराझींच्या वागणुकीमुळे मी कधीच माझ्यावर परिणाम होऊ देत नाही. असं देखील नोरा म्हणाली आहे.

Shikhar Bank Scam Update । ब्रेकिंग! शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवारांना EOW कडून क्लीन चीट

त्याचबरोबर पुढे बोलत असताना नोरा (Nora Fatehi) म्हणाली की, मला पापाराझीच्या या गोष्टींचा कधीच फरक पडला नाही. उलट मला माझ्या शरिरावर गर्व आहे. सुदैवाने मला खूप चांगली शरीरयष्टी मिळाली मला त्याची कधीच लाज वाटत नाही. दुर्दैवाने सोशल मीडियावर या गोष्टी ट्रेंड होत आहेत. असं देखील नोरा म्हणाली आहे.

Bachchu Kadu | राजकारणात मोठी खळबळ! बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले

Spread the love