Sanjay Raut । संजय राऊत यांचा धक्कादायक दावा, म्हणाले; “फडणवीसांना अटक होण्याची भीती असल्याने…”

Sanjay Raut । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या इतर काही नेत्यांना महाविकास आघाडीकडून अटक करण्याचं नियोजन होतं, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. याला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut vs Devendra Fadnavis)

Lok Sabha Election । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची होणार घरवापसी

“मला अटक होईल या भीतीने देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला होता. चाळीस आमदार घेऊन या नाहीतर अटक करू. असं त्यांना त्यावेळी सांगितलं होतं. एकनाथ शिंदे यांना देखील अटकेची भीती घातली होती,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Nora Fatehi | अभिनेत्री नोरा फतेहीच धक्कादायक वक्तव्य; म्हणाली, ते माझ्या बॅाडी पार्ट्सवर…’

पुढे संजय राऊत म्हणाले की, “प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यावर बँक घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी देखील सुरू होती. तसेच लाड यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. ही सर्व डरपोक लोकं आहेत. त्यांनी स्वत:ची अटक लपवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. गिरीश महाजन यांच्यावर देखील खूप मोठे गुन्हे आहेत,” असा दावा राऊत यांनी केला आहे.

Eknath Shinde । मुख्यमंत्री शिंदे यांनी मुस्लिमांबाबत केले मोठे वक्तव्य

Spread the love