Sharad Pawar । ‘त्या’ भेटीनंतर शरद पवारांचं सूचक वक्तव्य, म्हणाले; “तुम्हाला लवकरच…”

Sharad Pawar

Sharad Pawar । अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पाडून महायुतीसोबत युती केली आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना खूप मोठा धक्का बसला. शिवाय महाविकास आघाडीला देखील तडा गेला. बंडानंतर पाडव्याच्या दिवशी शरद पवारांच्या बारामतीतल्या गोविंदबाग या निवासस्थानी अजित पवार गेले होते. (Latest Marathi News)

Sharad Pawar । “माझ्या आयुष्यात असा एकही पंतप्रधान पाहिला नाही…”, मोदींबाबबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

काका-पुतण्याच्या भेटीवरून सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावर आता खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “होय, आमच्या भेटीचा अर्थ लवकरच तुम्हाला समजेल. निवडणुकीचा निकाल लागला की तुम्हाला लगेच आमच्या भेटीचा अर्थ कळेल.” परंतु, आता सर्वांना या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी? याची उत्सुकता लागली आहे.

Pune Crime News । पुण्यात गुन्हेगारी वाढली, वारजे परिसरात अज्ञात गुंडांनी पार्किंगमधील दुचाकी जाळल्या

दरम्यान, पाडव्याच्या दिवशी पूर्ण दिवस गोविंदबागेकडे अजित पवार फिरकले नव्हते. परंतु, अचानक ते संध्याकाळी शरद पवारांसोबत दिसले. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या देखील त्यांच्या घरी भाऊबीजेला गेल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना ओवाळलंही. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या चर्चा येत आहेत. भेटीचं गुपित अजून उघड झाले नाही.

Baramati News । धनगर बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बारामती कडकडीत बंद!

Spread the love