Sharad Pawar । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मी माझ्या काळात अनेक पंतप्रधान पाहिले आहेत, त्यांची भाषणे ऐकली आहेत, परंतु मी माझ्या आयुष्यात असा एकही पंतप्रधान पाहिला नाही की ज्याने कोणत्याही राज्याला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक वक्तव्य केले. शरद पवार म्हणाले की, कोणत्याही मुख्यमंत्र्यावर नाव घेऊन आरोप करणारा पंतप्रधान मी पाहिला नाही. (Latest Marathi News)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत (Trade association meetings) व्यापाऱ्यांना संबोधित करत होते. यावेळी शरद पवार यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर गांभीर्याने चर्चा केली. केंद्र सरकारच्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताच्या धोरणांवरही त्यांनी निशाणा साधला.
Baramati News । धनगर बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बारामती कडकडीत बंद!
जागावाटपाबाबतही लवकरच चर्चा होणार
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. लवकरच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांशी स्थानिक बाबींवर चर्चा करण्यात येईल, त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप करण्यात येईल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर, दिवाळीला अजित पवार यांच्यासोबत दिसल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, आम्ही सण एकत्र साजरे करतो, ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे, त्याला राजकीय महत्त्व नाही. असं शरद पवार म्हणाले आहेत.
Maharashtra Politics । ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याला पोलिसांनी केले अटक
केंद्राला व्यापारी आणि शेतकऱ्यांची चिंता नाही – शरद पवार
शरद पवार म्हणाले की, व्यापार आणि सहकार क्षेत्रात जे काही लोककल्याणकारी कायदे झाले आहेत, ते शेतकरी आणि व्यावसायिकांच्या हिताचे वाटत नाहीत. ते म्हणाले की, प्रत्येक व्यापारी आणि शेतकरी चार पैसे मिळवण्यासाठी मेहनत करतो, मात्र याबाबत सरकारचा दृष्टिकोन योग्य नाही. यासंदर्भात सरकारने तयार केलेली धोरणे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताची नाहीत, असे ते म्हणाले