Baramati News । धनगर बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बारामती कडकडीत बंद!

Baramti News

Baramati News । सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच पेटले आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ते अनेक ठिकाणी सभा देखील घेत आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता धनगर समाज ही आरक्षणाच्या (Dhangar reservation) मागणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Baramati News)

Maharashtra Politics । ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याला पोलिसांनी केले अटक

बारामती या ठिकाणी चंद्रकांत वाघमोडे (Chandrakant Waghmode) या तरुणाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मागच्या आठ दिवसापासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाकडून बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला बारामतीत उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

Babar Azam Captaincy Resign । पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, बाबर आझमने दिला कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा

धनगर समाजाच्या आरक्षण मागणीबाबत बारामती या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरू आहे. चंद्रकांत वाघमोडे हा तरुण आमरण उपोषणाला बसला आहे. शासनाकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देखील होत आहे. त्यामुळेच या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांकडून बारामती बंदची (Baramati Bandh) हाक देण्यात आली आहे.

Jammu Kashmir Accident । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! जम्मू काश्मीरमध्ये भीषण बस अपघात; २० पेक्षा जास्त प्रवासी दगावल्याची शक्यता

Spread the love