Mumbai News । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेने सोबत बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. मागच्या काही दिवसापासून हे दोन गट कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता सध्या या दोन गटात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर काल मोठा राडा झाला आहे. (Dadar Shivaji Park Ground)
Sharad Pawar । ‘त्या’ भेटीनंतर शरद पवारांचं सूचक वक्तव्य, म्हणाले; “तुम्हाला लवकरच…”
बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन असून या दिवशी दोन्ही गटात कोणतेही वाद होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी एक दिवस आधीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीतच दर्शन घेतलं. मात्र एकनाथ शिंदे स्मृतीतळावरून निघून गेल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि दोन्ही गटात मोठा राडा झाला हा राडा इतका मोठा होता की, पोलिसांची मोठी फौज घटनास्थळी दाखल झाली. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना देखील कठीण जात होते.
या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना दिवशी कोणताही वाद नको म्हणून मी आदल्या दिवशीच बाळासाहेबांच्या प्रतिष्ठानचे दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो, आमचे कार्यकर्ते निघत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी वातावरण कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं. खरं तर तसं करण्याची आवश्यकता नको होती. असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे यांनीही दिली यावर प्रतिक्रिया (Aditya Thackeray)
दरम्यान, या घटनेवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आमचे शिवसैनिक तिथे पाहणी करायला गेले होते त्यावेळी तिथे गद्दार गॅंग आली काहीतरी वेगळं करायला गेली, त्यांना तिथे रोखले गेलं” अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
Baramati News । धनगर बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बारामती कडकडीत बंद!