Pune Crime News । मागच्या काही दिवसापासून पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुणे शहरांमध्ये वाहनांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रकार सतत घडत आहेत. त्याचबरोबर कोयता गॅंग देखील पुण्यामध्ये सतत धुमाकूळ घालत गाड्यांची तोडफोड करत आहे. सध्या देखील पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना पुण्यामध्ये पार्किंग मधील वाहनांची जाळपोळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे तेथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune Crime News)
Baramati News । धनगर बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बारामती कडकडीत बंद!
पुणे शहरातील वारजे भागातील रामनगर टाकी चौक परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी रस्त्यावर पार्किंग मधील दुचाकी अज्ञातांनी पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजकंटकांकडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन दुचाकी पेटवण्यात आल्या तर एक चार चाकी वाहनाची काच फोडून नुकसान देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषयी ठरत आहे.
Maharashtra Politics । ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याला पोलिसांनी केले अटक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हा सर्व धक्कादायक प्रकार केला असावा अशी शक्यता देखील या ठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी लवकरात लवकर याबाबत तपास करावा आणि आरोपींना योग्य ती शिक्षा द्यावी. अशी मागणी देखील तेथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.