Sharad Pawar । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) धामधूम आपल्याला पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष नेत्यांच्या उमेदवारीची घोषणा देखील करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता माकपही दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे असून शरद पवार गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासह दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मानला जातोय. या मतदारसंघांमध्ये भाजपच्या वतीने डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे/ तर दुसरीकडे महाविकास आघाडी तर्फे ही जागा शरद पवार गटाला मिळाली असून त्या ठिकाणी भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मात्र या मतदारसंघावर माकपनेही दावा ठोकला असून माकपतर्फे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली असून याचा फायदा भाजप उमेदवार व विद्यमान खासदार भारती पवार यांना होऊ शकतो. अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.