Devendra Fadnavis । फडणवीसांचे खळबळजनक विधान, म्हणाले; “पवारसाहेब आपल्या पाठिशी”

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis । अकोला : केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या (Loksabha election) तारखा जाहीर करताच राजकीय नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. सभेदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । शरद पवार यांच्यासाठी समोर आली सर्वात धक्कादायक बातमी!

देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यातील लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असून त्यासाठी पवार साहेब आपल्या पाठिशी आहेत, असे वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

Congress | सर्वात मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; बड्या नेत्याने दिली भाजपची साथ

पण फडणवीस यांनी उल्लेख केलेले पवार साहेब म्हणजे कोण? प्रश्न अनेकांना पडला. देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा खुलासा करत पवार साहेब म्हणजे अजित पवार आहेत, असे म्हटले. फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. फडणवीस पुढे म्हणाले की,” विरोधक जर मोदीजींना पंतप्रधान करण्यास नकार देत असतील तर मग तुम्ही सांगा तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे आहे? देशाचा विकास कोण करेल?,” असा सवाल देखील फडणवीस यांनी विचारला.

Devendr Fadanvis । देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का! विद्यमान खासदाराने केला ठाकरे गटात प्रवेश

Spread the love