Sharad Pawar । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर, शरद पवारांना धक्का; पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

Sharad Pawar

Sharad Pawar । सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक पक्ष आपल्या नेत्यांची उमेदवारी जाहीर करत आहेत. तर काही नाराज नेते पक्षाला सोडचिट्ठी देत असल्याचे देखील पाहायला मिळत आहेत, या सर्व घडामोडी घडत असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.

Sydney Terror Attack । सर्वात मोठी बातमी, प्रसिद्ध मॉलवर भीषण दहशतवादी हल्ला, लोकांचा आरडाओरडा

रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील नाराजी समोर आली. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे भुसावळ वरणगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर आता माजी आमदार संतोष चौधरी देखील बंडाच्या तयारीत आहेत. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

Eknath Shinde । राजकीय वर्तुळात येणार मोठा भूकंप? मुख्यमंत्र्यांचा अचानक कोल्हापूर दौरा

रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील नाराजी समोर आली आहे. त्यामुळे आता आमदार संतोष चौधरी हे बंड करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामा दिल्याचे चित्र आहे.

Rain Update । पावसाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर!

Spread the love