Rain Update । पावसाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर!

Rain Update

Rain Update । भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.

Sayaji Shinde । शस्त्रक्रियेनंतर सयाजी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “पुढील दहा वर्ष मी…”

हवामान खात्याने म्हटले आहे की, शनिवारी गंगेच्या पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

Supriya Sule । “… त्यांना शरद पवारांना संपवायचंय”, सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप

स्कायमेट हवामान अहवालानुसार, राजस्थानमध्ये गडगडाट, धुळीचे वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. दरम्यान, काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. या काळात राज्याच्या तापमानात किंचित घट होईल.

Maharashtra Politics । ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का

हवामान खात्याने म्हटले आहे की, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहतील. छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कोस्टल कर्नाटक या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Spread the love