Eknath Shinde । राजकीय वर्तुळात येणार मोठा भूकंप? मुख्यमंत्र्यांचा अचानक कोल्हापूर दौरा

Eknath Shinde

Eknath Shinde । राज्यात लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Elections) जोरात तयारी सुरु आहे. राजकीय पक्ष ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. अशातच आता लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अचानक कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Latest marathi news)

Rain Update । पावसाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर!

कोल्हापूर दौऱ्यावेळी मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांना शुक्रवारी हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री दौऱ्यावर येणार आहेत, अशी शक्यता आहे. एकनाथ शिंदे दुपारी अडीच वाजता येथील विमानतळावर दाखल होऊन सव्वापाच वाजता राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.

Sayaji Shinde । शस्त्रक्रियेनंतर सयाजी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “पुढील दहा वर्ष मी…”

त्यानंतर सहा वाजता ते विश्‍वपंढरी सांगवडेकर महाराज मठाकडे जाणार आहेत. हॉटेल पॅव्हेलियनमध्ये विविध संघटना प्रतिनिधींशी चर्चा करून त्यानंतर ते पावणेआठच्या सुमारास कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Supriya Sule । “… त्यांना शरद पवारांना संपवायचंय”, सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप

Spread the love