Sydney Terror Attack । सर्वात मोठी बातमी, प्रसिद्ध मॉलवर भीषण दहशतवादी हल्ला, लोकांचा आरडाओरडा

Sydney Terror Attack

Sydney Terror Attack । ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडनीतील एका शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार आणि चाकूने हल्ला केल्यानंतर या चार जणांची हत्या करण्यात आली. सिडनी पोलीस या घटनेला दहशतवादी हल्ला मानत आहेत. हल्ल्यानंतर मॉलमध्ये अराजकता पसरली. जीव वाचवण्यासाठी लोक सर्वत्र धावू लागले.

Eknath Shinde । राजकीय वर्तुळात येणार मोठा भूकंप? मुख्यमंत्र्यांचा अचानक कोल्हापूर दौरा

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मॉलमध्ये अडकलेल्या हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की संपूर्ण मॉलला घेरण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते, त्यापैकी एक ठार झाला आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

Rain Update । पावसाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर!

न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितले की, शनिवारी दुपारी दुकानदारांनी खचाखच भरलेल्या वेस्टफील्ड बोंडी जंक्शन मॉल कॉम्प्लेक्समध्ये हा हल्ला झाला. सध्या मॉल बंद करण्यात आला असून पोलिसांनी लोकांना या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेसंदर्भात पोलीस तपास करत आहेत. हा हल्ला कुठून झाला आणि त्याची मागणी काय होती याचा तपास पोलीस करत आहेत.

Sayaji Shinde । शस्त्रक्रियेनंतर सयाजी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “पुढील दहा वर्ष मी…”

Spread the love