
Delhi Crime । देशाची राजधानी दिल्लीत गुन्हेगारी घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. ईशान्य दिल्लीतील सीलमपूर भागात हृदय पिळवटून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. सीलमपूरच्या भंगार बाजारात शुक्रवारी सकाळी 11.34 वाजता शाहनवाज नावाच्या तरुणाच्या डोक्यात पाँईट ब्लँक रेंजमधून मागून गोळ्या झाडण्यात आल्या. स्थानिक लोकांनी जखमी शाहनवाजला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक तरुण एका व्यक्तीचा पाठलाग करत येत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्याला डोक्याच्या मागच्या भागात अगदी जवळून गोळ्या घालताच पळून जातो. तरुण बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडला. ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर इतर लोकही उपस्थित होते.
Raj Thackeray । बिनशर्त पाठिंबा का? पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केला सर्वात मोठा खुलासा
या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या हल्लेखोर फरार आहे. दिल्ली पोलीस त्याच्या शोधात व्यस्त आहेत..पोलिसांनी कलम ३०७ आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास सुरू केला आहे.
Sydney Terror Attack । सर्वात मोठी बातमी, प्रसिद्ध मॉलवर भीषण दहशतवादी हल्ला, लोकांचा आरडाओरडा