Sharad Pawar । भरसभेत शरद पवारांनी मान्य केली चूक, म्हणाले; “पाच वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची माफी…”

Sharad Pawar । महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Chandra Pawar Party) नेते शरद पवार दौरे करत आहेत. पण आज चक्क शरद पवारांनी भरसभेत आपली चूक मान्य केली आहे.

Ravi Kishan । भाजप उमेदवार रवी किशन यांच्याविरोधात खटला दाखल, नेमकं कारण काय?

“आज अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांच्या प्रचारार्थ अमरावतीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेतली.यावेळी शरद पवार म्हणाले की,” पाच वर्षांपूर्वी मी एक चूक केली होती. त्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. मागच्या वेळी मी नवनीत राणा (Navneet Rana) यांना पाठिंबा दिला. आता ती चूक कधी होणार नाही. ती चूक दुरुस्त करणार आहे.”

Loksabha election । सर्वात मोठी बातमी! भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल, ‘तो’ व्हिडिओ ठरणार डोकेदुखी

“आगामी लोकसभा निवडणुकीत बळवंत वानखडे यांना विजयी करा, हे सांगायला मी आलो आहे. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि मी स्वत: तसेच आमचे आघाडीचे सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपली भूमिका मांडत आहेत. जे काही संकट देशावर दिसत आहे, त्यातून कशी मुक्तता होईल याचा विचार मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे,” असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

Narayan Rane । नारायण राणे आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून डोळे फिरतील

Spread the love