Jitendra Awhad । बिग ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या निशाण्यावर, लाखोंची मागणी करत…

Jitendra Awhad

Jitendra Awhad । काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. या घटनेची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिष्णोई गँगकडून घेण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने दोन जणांना अटक केली. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगने (Bishnoi Gang) टार्गेट केले आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । भरसभेत शरद पवारांनी मान्य केली चूक, म्हणाले; “पाच वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची माफी…”

बिष्णोई गँगकडून आता बॉलीवूडनंतर राजकीय लोकांना लक्ष केले जात आहे. जितेंद्र आव्हाड देखील या गँगच्या रडारवर आले आहे. बिष्णोई गँगने त्यांना धमकी देत लाखो रुपयांची मागणी केली आहे. आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला असून धमकी देणाऱ्याने त्यांच्याकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे.

Ravi Kishan । भाजप उमेदवार रवी किशन यांच्याविरोधात खटला दाखल, नेमकं कारण काय?

जर पैसे दिले नाही तर सलमान खान सारखे होईल, असे म्हटले आहे. धमकी देणाऱ्याने आपले नाव रोहित गोदारा असे सांगितले आहे. आव्हाड यांना हा फोन ऑस्ट्रेलियातून आला आहे. दरम्यान या प्रकरणी लवकरच जितेंद्र आव्हाड पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे. पोलीस सलमान खान प्रकरणासारखे या प्रकरणातील आरोपींना शोधतील, अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Loksabha election । सर्वात मोठी बातमी! भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल, ‘तो’ व्हिडिओ ठरणार डोकेदुखी

Spread the love