Sambhajiraje Chhatrapati । मोठी बातमी! 5 दिवसांपासून संभाजीराजे नॉट रिचेबल

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Not Reachable

Sambhajiraje Chhatrapati । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मागच्या पाच दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. संभाजी राजे नेमके कुठे आहेत? याची माहिती त्यांच्या कुटुंबाला देखील नाही. 2 फेब्रुवारीला संभाजी राजे छत्रपती यांनी एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहेत. (Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Not Reachable)

Eknath Shinde । राष्ट्रवादीच्या निकालावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, “लोकशाहीत पुन्हा….”

संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. संभाजीराजे यांच्या राजकीय भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात सध्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे. आता यावर यावर संभाजीराजे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती.

Jitendra Awhad । ‘जो काकांचा नाही झाला तो लोकांचा काय होणार’, जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर जोरदार टीका

“स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे”, अशी संभाजी राजे छत्रपती यांची फेसबुक पोस्ट आहे.

Viral Video । मॉलच्या चेंजिंग रूममध्ये मुलाने केले असे कृत्य की, व्हिडीओ पाहून तुम्हीही…

दरम्यान संभाजीराजे यांचा ११ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यामुळे संभाजीराजेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी देखील जोरदार तयारी केली आहे. मात्र या कार्यक्रमाला संभाजीराजे उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांची भूमिका काय असेल, हे जेव्हा संभाजीराजे बोलतील तेव्हाच स्पष्ट होईल.

Viral Video । पेट्रोल संपले, आरोपींनी गाडीला धक्का दिला, पोलिसांची कारवाई पाहून लोक भडकले

Spread the love