Viral Video । सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कैदी पोलिसांच्या गाडीला धक्का देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Supriya Sule । निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, “आता आम्ही…”
व्हिडिओमध्ये काय आहे?
बिहारमध्ये दारूबंदी आहे. तेथे पोलीस दारू पिणाऱ्या लोकांना अटक करतात. बिहार सरकार दारूची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी खूप पैसा खर्च करते. याशिवाय दारूची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई केली जाते. पण तरीही लोक राजी होत नाहीत आणि छुप्या पद्धतीने दारूचे सेवन करत आहेत. बिहारमध्ये अशाच प्रकारे पकडलेल्या मद्यपींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते पोलिसांच्या गाडीला धक्का देताना दिसत आहे.
Rohit Pawar । निवडणूक आयोगाच्या निकालावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पक्षाचा बाप…”
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हा व्हिडिओ बिहारमधील भागलपूरचा आहे, जिथे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने मिळून काही मद्यपींना अटक केली आहे. मद्यपींना अटक केल्यानंतर पोलीस त्या कैद्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. दरम्यान, मध्यंतरी पोलिसांच्या गाडीचे पेट्रोल संपले आणि पोलिसांनी कैद्यांना कारमधून खाली उतरून ढकलण्यास सांगितले.
व्हिडिओमध्ये 4 कैदी एकत्र गाडीला धक्का देत असल्याचे दिसत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर टाकला. यानंतर बिहार पोलिसांवर बरीच टीका होत आहे.
पुलिस की गाड़ी और धक्का मारते क़ैदी।
— Anurag Chaddha (@AnuragChaddha) February 3, 2024
ये लिखने की ज़रूरत नहीं है कि दृश्य बिहार का है। 😀 #Bhagalpur pic.twitter.com/4GiJUY16JI