Devendra Fadnavis । महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वादावर निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला आहे. शरद पवार गटाला मोठा झटका देत निवडणूक आयोगाने अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस मानली आहे.राष्ट्रवादी पक्षातील वादावर 10 हून अधिक सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला नाव आणि चिन्हही सुपूर्द केले आहे. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी फक्त चार शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. “हा निर्णय अपेक्षित आहे,” या 4 मोजक्या शब्दांमध्ये फडणवीस यांनी या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली. “मागच्या अनेक वर्षामध्ये सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली त्याकडे पाहिल्यास अगदी समाजवादी पार्टीच्या केस वेळीही निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका आणि इतर 5 प्रकरणात घेतलेली भूमिका पाहा. आयोगाची सातत्याने अशीच भूमिका राहिलेली आहे. आलेला निर्णय अपेक्षितच आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आमच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्याचे आम्ही नम्रपणे स्वागत करतो. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कोणत्याही राजकीय पक्षासाठी निवडणूक चिन्ह महत्त्वाचे असते.
Viral Video । मॉलच्या चेंजिंग रूममध्ये मुलाने केले असे कृत्य की, व्हिडीओ पाहून तुम्हीही…