Eknath Shinde । राष्ट्रवादीच्या निकालावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, “लोकशाहीत पुन्हा….”

Eknath Shinde

Eknath Shinde । महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवार गटालाच (Ajit Pawar group) खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. दरम्यान यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Jitendra Awhad । ‘जो काकांचा नाही झाला तो लोकांचा काय होणार’, जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर जोरदार टीका

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते. अजित पवार यांच्याकडे आज बहुमत आहे, त्यामुळे आज निवडणूक आयोगाने गुणवत्तेवर निर्णय घेतला आहे. लोकशाहीत पुन्हा बहुमत सिद्ध झाले आहे. अजित पवार यांना माझ्या शुभेच्छा.

Viral Video । मॉलच्या चेंजिंग रूममध्ये मुलाने केले असे कृत्य की, व्हिडीओ पाहून तुम्हीही…

त्याचवेळी शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेसोबत जे काही केले, तेच आमच्यासोबत केले, असे सांगितले. या पक्षाचे संस्थापक सदस्य आणि संस्थापक नेते एकच व्यक्ती आहेत आणि ते म्हणजे शरद पवार. वातावरण वेगळे आहे, देशात एक ‘अदृश्य शक्ती’ आहे जी हे सर्व करत आहे. आम्ही निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात जाऊ. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Viral Video । पेट्रोल संपले, आरोपींनी गाडीला धक्का दिला, पोलिसांची कारवाई पाहून लोक भडकले

दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाची प्रतीक्षा होती. तो निकाल आज अखेर जाहीर झाला. आजच्या सुनावणीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांच्या गटाचे दिग्गज नेते देखील या सुनावणीला हजर होते. स्वतः शरद पवार सुनावणीला हजर असून देखील अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar । राष्ट्रवादीच्या निर्णयानंतर शरद पवार नवीन पक्ष काढणार का? यावर अजित पवार यांनी दिले सडेतोड उत्तर

Spread the love