Jitendra Awhad । ‘जो काकांचा नाही झाला तो लोकांचा काय होणार’, जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर जोरदार टीका

Jitendr Awhad On Ajit Pawar

Jitendra Awhad । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) वाद प्रकरणी निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस मानली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नियंत्रण आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह (घड्याळ) अजित पवार गटाकडे दिले आहे.

Viral Video । मॉलच्या चेंजिंग रूममध्ये मुलाने केले असे कृत्य की, व्हिडीओ पाहून तुम्हीही…

निवडणूक आयोगाचा हा निर्णय शरद पवार यांच्या ६३ वर्षांच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून शरद पवारांपुढे कोणता पर्याय उरतो? दरम्यान अजित पवारांना राष्टवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या प्रकाणावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Viral Video । पेट्रोल संपले, आरोपींनी गाडीला धक्का दिला, पोलिसांची कारवाई पाहून लोक भडकले

जितेंद्र आव्हाडांनी काही ट्विट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा’ असं ट्विट करत आव्हाडांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर दुसरे एक ट्विट करत “भीड में रहकर भी तनहा कौन है, ये तो झुठे से झुठा भी बतादेगा सच्चा कौन हैं | भेडीयों की भीड में शेर आने दो, पता चलेगा जंगल का राजा कौन है” असं ट्विट देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Ajit Pawar । राष्ट्रवादीच्या निर्णयानंतर शरद पवार नवीन पक्ष काढणार का? यावर अजित पवार यांनी दिले सडेतोड उत्तर

Spread the love