Road Accident News । काळीज पिळवून टाकणारा अपघात; बस ट्रकच्या धडकेत ६ जणांचा होरपळून मृत्यू; पाहा घटनेचा धक्कादायक video

Road Accident News

Road Accident News । आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील विजयवाडा महामार्गावर बुधवारी सकाळी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या धडकेत सहा जण जिवंत भाजले. दरम्यान, 32 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये बस आगीच्या भक्ष्यस्थानी आहे. बस आणि ट्रकची धडक इतकी धोकादायक होती की बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले.

Rakhi Sawant । ब्रेकिंग! अभिनेत्री राखी सावंतची प्रकृती खालावली; रुग्णालयामध्ये उपचार सुरु

आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला पाचारण करून अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. हे सर्व लोक बापटला येथून मतदान करून घरी परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात बस आणि ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय चार प्रवाशांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.

Pune Loksabha । ब्रेकिंग! पुण्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आली समोर; धंगेकर की मोहोळ, कोण बाजी मारणार

या भीषण अपघातात ठार झालेले लोक बापटला जिल्ह्यातील रहिवासी होते. या भीषण अपघातात 32 जण जखमी झाले आहेत, सर्व जखमींना चिलाकालुरीपेट शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

Devendra Fadnavis । अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

Spread the love