Rakhi Sawant । बिग बॉसची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतला अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राखीचे फोटो शेअर करताना एका सोशल मीडिया हँडलने राखीला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले होते. पण सूत्रांकडून TV9 हिंदी डिजिटलला मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंत सध्या जुहू येथील ‘क्रिटी केअर हॉस्पिटल’च्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल आहे.
तिच्यावर काही मोठ्या चाचण्या केल्या जात आहेत आणि कालही डॉक्टरांनी तीच्यावर काही चाचण्या केल्या होत्या. या सर्व चाचण्यांचे निकाल आल्यानंतरच राखीच्या आरोग्याबाबत योग्य माहिती उपलब्ध होईल. राखी पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत तिला रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
Devendra Fadnavis । अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!
राखीचा फोन तिचा जवळचा मित्र रितेशकडे आहे. खरंतर, 14 मे 2024 रोजी छातीत दुखू लागल्याने राखीला तिच्या मैत्रिणींनी रुग्णालयात दाखल केले होते. टाइम्स नाऊला याची पुष्टी करताना राखीने सांगितले होते की तिला हृदयाचा त्रास आहे आणि त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला पुढील 5-6 दिवस विश्रांतीची गरज आहे आणि या काळात ती कोणाशीही बोलू शकणार नाही. राखी, रितेश किंवा क्रिती केअर हॉस्पिटलकडून हृदयविकाराच्या झटक्याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.
Urfi Javed | काय सांगता? उर्फी जावेदने केलं टक्कल?; सोशल मीडियावर शेअर केला फोटो