Devendra Fadnavis । राजकारणातून मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Devendr Fadanvis

Devendra Fadnavis । महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला आधीच माहीत होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठा खुलासा केला आहे. एबीपी न्यूजच्या महाराष्ट्र समिट या कार्यक्रमातील संवादादरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला मुख्यमंत्री न केल्याचा अजिबात राग नाही.

Road Accident News । काळीज पिळवून टाकणारा अपघात; बस ट्रकच्या धडकेत ६ जणांचा होरपळून मृत्यू; पाहा घटनेचा धक्कादायक video

मुख्यमंत्री न झाल्यामुळे एक मिनिटही रागावले नाही, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मी जबाबदारीने सांगतो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे हा माझा प्रस्ताव होता. कारण त्यांच्यावर विश्वास बसावा म्हणून अनेक लोक त्यांच्यासोबत आले होते. मी पक्षालाही हेच सांगितले. मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला आधीच माहीत होते.

Ketan Tirodkar Arrested । धक्कादायक बातमी! उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकणारी पत्रकाराला अटक

याशिवाय महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व काही नियोजनानुसार झाले आहे. आम्ही आधीच 90 टक्के गोष्टी सोडवल्या होत्या. 10 टक्के जागांवर विलंब झाला, मात्र या जागा शेवटच्या टप्प्यात होत्या. त्यामुळे घाई नव्हती. पाच जागांवर जोरदार चर्चा झाली, तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली. MVA सारखे झाले नाही की, मधल्या चर्चेत जागा जाहीर झाल्या.

Rakhi Sawant । ब्रेकिंग! अभिनेत्री राखी सावंतची प्रकृती खालावली; रुग्णालयामध्ये उपचार सुरु

Spread the love