Ketan Tirodkar Arrested । धक्कादायक बातमी! उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकणारी पत्रकाराला अटक

Devendr Fadanvis

Ketan Tirodkar Arrested । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी पत्रकार केतन तिरोडकर यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, केतन तिरोडकर याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

Pune Loksabha । ब्रेकिंग! पुण्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आली समोर; धंगेकर की मोहोळ, कोण बाजी मारणार

मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सांगितले की, व्हिडिओमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कठोर कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने माजी पत्रकार केतन तिरोडकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याआधी पोलिसांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केतन तिरोडकरला ताब्यात घेतले होते.

Rakhi Sawant । ब्रेकिंग! अभिनेत्री राखी सावंतची प्रकृती खालावली; रुग्णालयामध्ये उपचार सुरु

Spread the love