Pune News । सध्या वातावरण बदलताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने जोर धरला आहे. वादळी वाऱ्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान मागच्या दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर या ठिकाणी होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातून देखील एक होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Bus Accident । ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी; पाहा video
पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील मोशी या ठिकाणी रस्त्याच्या बाजूचे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळ त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. होर्डिंग खाली चार दुचाकी आणि टेम्पो दबल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
Milind Deora । काँग्रेस सोडल्यानंतर शिवसेनाच का भाजप का नाही? मिलिंद देवरा यांनी केला मोठा खुलासा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या ठिकाणी शहरातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्यासह वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले.
Viral Video । बसमध्ये कपलचे पुन्हा एकदा अश्लील कृत्य; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल