Sharad Pawar । शरद पवार यांच्या सभेवेळी घडलं भयानक; वादळ सुटले, बॅनर पडले अन्…

Sharad pawar

Sharad Pawar । महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा पाचवा टप्पा पार पडत आहे. यासाठी दोन दिवस बाकी आहेत. यामुळे सर्व राजकीय पक्षांकडून सभेचे आयोजन करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून देखील अनेक ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान शरद पवार यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासाठी आज सभा घेतली. यावेळी जोरदार वादळ सुटले आणि शरद पवार यांचे भाषण सुरू होते.

Bus Accident । ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी; पाहा video

या वादळामुळे व्यासपीठावरील मागील बाजूला असलेले बॅनर पडले. वादळाची परिस्थिती पाहून शरद पवार यांनी आपले भाषण थोडक्यात आवरते घेतले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकारने ही जबाबदारी पार पडली नाही असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Milind Deora । काँग्रेस सोडल्यानंतर शिवसेनाच का भाजप का नाही? मिलिंद देवरा यांनी केला मोठा खुलासा

पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही सत्तेवर असताना माझ्या विरोधात भाजपावाल्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून घोषणा दिल्या होत्या. मात्र आता सरकार असताना भाव देत नाही. यावर्षी कांद्याचे उत्पादन चांगले होते त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत होते. परंतु सरकारने निर्यात बंदी केली. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आल्याचं शरद पवार म्हणत आहेत.

Viral Video । बसमध्ये कपलचे पुन्हा एकदा अश्लील कृत्य; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Spread the love