Eknath Shinde । मतदानापूर्वी एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडला पक्ष

Eknath Shinde

Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. प्रचार देखील अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र यामध्येच आता एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Pune News । मुंबईनंतर पुण्यात घडली धक्कादायक घटना, वादळी वाऱ्यामुळे कोसळलं भलंमोठं होर्डिंग

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अरविंद मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या सभेत व्यासपीठावर स्थान न मिळाल्यामुळे अरविंद मोरे यांनी पक्षाची साथ सोडल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक कार्यक्रमात ते आघाडीवर होते. मात्र त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांच्या सभेवेळी घडलं भयानक; वादळ सुटले, बॅनर पडले अन्…

अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा पत्र देखील पाठवले आहे. दरम्यान कल्याण मधील मतदान दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच अरविंद मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच अरविंद मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.

Mumbai hoarding collapse । मुंबई होर्डिंग घटना: भावेश भिंडे फक्त 4 होर्डिंग्जमधून वर्षाला 25 कोटी रुपये कमवत होते का?

Spread the love