Pune Accident । पहाटेच्या सुमारास पुणे शहरात मोठा अपघात! कंटेनरची ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक; दोन जण जागीच ठार

Accident

Pune Accident । सध्या पुणे शहरातून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे या ठिकाणच्या जांभूळवाडी दरी पुलावर भीषण अपघात झाला आहे. टेम्पो, पिकप, कंटेनर, बस अशा वाहनांचा एक विचित्र अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये एकाच वेळी चार वाहने एकमेकांना धडकली आहेत.

Indapur News । इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक उपाध्यक्षपदी संदीप चांदगुडे यांची फेर निवड

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळतात तेथील स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या अपघाताचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Sikandar Shaikh । मोठी बातमी! सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा

याबाबत अधिकची माहिती अशी की, साताऱ्याहून येणाऱ्या एका भरधाव कंटेनर ने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली मात्र पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. सध्या या महामार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे.

Ajit Pawar । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटातील आमदार अजित पवार गटात जाणार

Spread the love