Ajit Pawar । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटातील आमदार अजित पवार गटात जाणार

Sharad Pawar

Ajit Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट असे दोन गट पडले. अनेक नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी अजित पवारांना समर्थन केले. काही नेते अजित पवारांसोबत गेले आणि नंतर शरद पवारांकडे परत आले. दरम्यान आता हवेलीचे आमदार अशोक बापू पवार हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या आहेत.

Eknath Shinde । एकनाथ शिंदेंसाठी सर्वात धक्कादायक बाब! स्वतःच्याच गटाचे आमदार गेले विरोधात; नेमकं प्रकरण काय?

हवेलीचे आमदार अशोक बापू पवार (MLA Ashok Bapu Pawar) हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रांगण्याचे कारण म्हणजे ते शरद पवार गटाचे आमदार असून आज अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गाडीत गेले. त्यामुळे ते अजित पवार गटात जाणार का? याबाबतची चर्चा रंगली आहे.

Viral Video । कार पार्किंगमध्ये सहा तरुणींची तुफान हाणामारी; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

सुरुवातीला अजित पवार यांना अशोक पवारांनी समर्थन दिल होत मात्र त्यानंतर ते शरद पवार गटात पुन्हा आले. मात्र आज ते दिलीप वळसे पाटील यांच्या गाडीत असल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली यावेळी अशोक बापू पवार हे वळसे पाटलांच्या गाडीत दिसून आले. त्यामुळे ते अजित पवार गटात जाणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Dilip Walse Patil । “ही भेट पूर्वनियोजित होती त्यामुळे…”, शरद पवारांना भेटताच दिलीप वळसे पाटलांनी दिली प्रतिक्रिया

Spread the love