Uddhav Thackeray । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊत म्हणाले की, ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे आम्ही ४ वाजता आनंद नगर नाक्यावर पोहचत आहोत. शाखेवर बुलडोजर फिरवायला कोणी सांगितले? उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि २०२४ नंतर ते परत एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहेत हे विसरू नका, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

Pune Accident । पहाटेच्या सुमारास पुणे शहरात मोठा अपघात! कंटेनरची ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक; दोन जण जागीच ठार

मुंब्रा येथील शाखेवरून शिंदे गट अणि ठाकरे गट यांच्यात मोठा वाद झाला होता. यांनतर आता आज उद्धव ठाकरे या ठिकाणी पाहणी करण्याकरिता येणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते मात्र काही अज्ञात व्यक्तींनी ते बॅनर फाडले आहेत. त्यावरून संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

Indapur News । इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक उपाध्यक्षपदी संदीप चांदगुडे यांची फेर निवड

त्याचबरोबर संजय राऊत यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांना मुंब्रा्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलेलं आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. आम्ही आज ४ वाजता आनंद नगर नाक्यावर पोहचत आहोत. कोणाच्यात हिंमत असेल तर आम्हाला अडवून दाखवा असं आव्हान संजय राऊतांनी केल आहे.

Sikandar Shaikh । मोठी बातमी! सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा

Spread the love