Indapur News । इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक उपाध्यक्षपदी संदीप चांदगुडे यांची फेर निवड

Indapur News

Indapur News । इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्षपदी म्हसोबाची वाडी गावचे माजी उपसरपंच यांची फेरनिवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले यावेळी माजी राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रेय मामा भरणे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रताप पाटील, हेमंत पाटील, बापूराव शेंडे, सचिन सपकाळ व राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर व इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sikandar Shaikh । मोठी बातमी! सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा

आमदार दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय म्हणून चांदगुडे यांची ओळख आहे. पहिल्यांदा देखील चांदगुडे युवकचेच उपाध्यक्ष होते पुन्हा एकदा त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Ajit Pawar । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटातील आमदार अजित पवार गटात जाणार

यावेळी बोलताना संदीप चांदगुडे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय मामा भरणे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारडकर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल व पक्षाचे विचार ध्येय धोरणे तसेच कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील तसेच कटिबद्ध राहणार आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदेंसाठी सर्वात धक्कादायक बाब! स्वतःच्याच गटाचे आमदार गेले विरोधात; नेमकं प्रकरण काय?

Spread the love