Palasadev Temple । 46 वर्षात केवळ 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातलं पळसदेव मंदिर, नयनरम्य दृश्य पाहून व्हाल थक्क

Palasdev Mandir

Palasadev Temple । सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. अनेकजण या दिवसात आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत फिरायला जातात. महाराष्ट्रात पर्यटकांची संख्या खूप जास्त आहे. महाराष्ट्रात अशी काही ठिकाणे आहेत ज्याची दृश्य खूप नयनरम्य आहेत. विशेष म्हणजे ही ठिकाणे अनेकांना माहिती नाही. महाराष्ट्रातलं एक असं मंदिर (Temple in Maharashtra) आहे जे 46 वर्षात केवळ 5 वेळा दिसलं आहे. (Latest marathi news)

Ajit Pawar । राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी! अजितदादांचे पन्नास टक्के उमेदवार आयात केलेले

सोलापूरजवळील इंदापूरमध्ये इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी खूप गर्दी करतात. कारण उजनी धरणाच्या साठ्याचे पाणी कमी झाल्यावर तिथे असणाऱ्या पळसदेव गावाजवळील पळसनाथ मंदिराचं (Palasnath Temple) दर्शन होतं. इतर वेळेस हे मंदिर पाण्याखाली बुडालेले असते. पण जसे उजनी धरणातील पाणीसाठा कमी होतो. तसे या मंदिराचं दर्शन होते.

Pune Crime । पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार; महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याला…

या मंदिराबाबत सांगायचं झाला तर पळसदेव गावाच्या किनाऱ्यापासून बोटीने पळसनाथ मंदिराकडे जावं लागतं. पळसनाथ हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचं आहे. बाराव्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर प्रस्थापित झालं आहे. सध्या उजनी धरणाचा पाणीसाठा हा 37 टक्क्यांवर गेल्याने पर्यटकांना प्राचीन पळसनाथ मंदिराचं दर्शन होत.

Crime । ड्रग्जच्या नशेत तरुणीसोबत रोमान्स, माजी मंत्र्याच्या मुलाला पोलिसांनी हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले

मागील अनेक वर्ष पाण्याखाली बुडालेल्या जुन्या गावाच्या गावखुणा मोकळ्या झाल्याने आता आपल्याला समृद्ध पळसदेव गावचं वैभव पाहायला मिळत आहे. गावाभोवती तट आणि तटाला भट, नाथ, चांभार आणि मुख्य चार वेशी पाहून प्रत्येकाचे डोळे दिपून जातात. उजनी धरणाच्या बांधणीनंतर 1977 मध्ये जुन्या पळसदेव गावाला जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर 2002 मध्ये 2013, 2017 आणि 2024 मध्ये हे मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आलं आहे. सध्या पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

Maharashtra politics । सर्वात मोठी बातमी! तब्बल 55 वर्षांनंतर घेणार शरद पवार घेणार कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या कुटुंबीयांची भेट

Spread the love