
Crime । हिमाचल प्रदेशातील शिमला येथे पोलिसांनी पंजाब सरकारमधील माजी मंत्री सुचा सिंग लंगाह यांच्या मुलाला एका हॉटेलमधून अटक केली आहे जिथे तो मुलीसोबत रोमान्स करत होता. माजी मंत्र्याच्या मुलाकडून पोलिसांनी 42 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहेत. याशिवाय एका मुलीसह अन्य 4 जणांनाही अटक करण्यात आली आहे. शिमला पोलिसांच्या स्पेशल सेल टीमला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच पुढील कार्यवाही सुरू आहे. आरोपींनी ड्रग्ज कुठून आणले याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस आरोपींचे बँक डिटेल्सही तपासत आहेत. चौकशीदरम्यान आरोपींकडून ड्रग्स माफियाशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात.
Nitesh Rane । ‘मला हवं तसं लीड मिळालं नाही तर….’ नितेश राणेंनी दिली थेट धमकी
पोलिसांनी सर्वांना एका खासगी हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका हॉटेलमधून एका मुलीसह पाच जणांना 42 ग्रॅम ड्रग्जसह अटक केली आहे. प्रकाश सिंग, अबानी, अजय कुमार, शुभम कौशल, बलबिंदर अशी आरोपींची नावे आहेत. यातील एक आरोपी स्वत:ला पंजाब पोलिसांचा हवालदार म्हणवून घेत आहे. यापैकी चार पंजाबचे तर एक हिमाचलचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
Dhananjaya Mahadik । धनंजय महाडिक यांनी लावली 5 कोटी रुपयांची शर्यत, नेमकं कारण काय?