Maharashtra politics । सर्वात मोठी बातमी! तब्बल 55 वर्षांनंतर घेणार शरद पवार घेणार कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या कुटुंबीयांची भेट

Maharashtra politics

Maharashtra politics । अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) येऊन ठेपल्या आहेत. राज्यात कोणाचं सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. अशातच राज्याच्या राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खासदार शरद पवार (Sharad Pawar) तब्बल 55 वर्षांनंतर आपल्या कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. (Latest marathi news)

Nitesh Rane । ‘मला हवं तसं लीड मिळालं नाही तर….’ नितेश राणेंनी दिली थेट धमकी

माजी खासदार संभाजी काकडे (Sambhaji Kakade) यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यामुळे शरद पवार हे थोड्याच वेळात काकडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर तब्बल 55 वर्षांनी शरद पवार हे आज काकडे कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

Dhananjaya Mahadik । धनंजय महाडिक यांनी लावली 5 कोटी रुपयांची शर्यत, नेमकं कारण काय?

काकडे यांनी शरद पवारांच्या विरोधात अनेक वेळा खासदारकी आणि आमदारकी लढवली होती. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मागील पाच वर्षांपासून काकडे कुटुंबीयांशी जुळवून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजीत काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली आहे.

Sayaji Shinde । ब्रेकिंग! अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

Spread the love