Pune Crime । पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार; महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याला…

Pune Crime

Pune Crime । पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र या विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून मागच्या काही दिवसापासून अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या देखील एका शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून उघडकीस आला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Crime । ड्रग्जच्या नशेत तरुणीसोबत रोमान्स, माजी मंत्र्याच्या मुलाला पोलिसांनी हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले

पुण्याच्या एका शाळेतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. याचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पालक वर्गाकडून शिक्षिकेप्रति प्रचंड चिड आणि मुलांप्रति काळजी व्यक्त केली जात आहे.

Maharashtra politics । सर्वात मोठी बातमी! तब्बल 55 वर्षांनंतर घेणार शरद पवार घेणार कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या कुटुंबीयांची भेट

जयेश शिवाजी लोंढे असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याला शिक्षिकेकडून मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पालकांकडून पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nitesh Rane । ‘मला हवं तसं लीड मिळालं नाही तर….’ नितेश राणेंनी दिली थेट धमकी

Spread the love