Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; आणखी एक नेता करणार भाजपात प्रवेश

Congress

Congress । सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र लोकसभा निवडणुका जवळ आल्या असल्या तरी नाराज नेते पक्षांतर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. राजापूर मध्ये भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Palasadev Temple । 46 वर्षात केवळ 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातलं पळसदेव मंदिर, नयनरम्य दृश्य पाहून व्हाल थक्क

काँग्रेसचे कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर हे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 15 एप्रिल ला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Ajit Pawar । राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी! अजितदादांचे पन्नास टक्के उमेदवार आयात केलेले

रत्नागिरी या ठिकाणी एका समारंभात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मांडवकर हे राजापूर तालुका कुणबी सहकारी पत पेढीचे अध्यक्ष देखील आहेत. यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.

Pune Crime । पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार; महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याला…

Spread the love