Bachchu Kadu | राजकारणात मोठी खळबळ! बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले

Bachachu Kadu

Bachchu Kadu | सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. सगळीकडे धुमधडाक्यात प्रचार देखील सुरु आहे. बडे नेते जाहीर सभा घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसापासून अमरावती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. या ठिकाणी नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना विरोध दर्शवला. सध्या सायन्सकोर मैदानावरुन नवनीत राणा आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) आमने-सामने आले आहेत.

Sharad Pawar । बड्या नेत्याने शरद पवारांना सुनावले; केली जोरदार टीका

या मैदानावर अमित शाह यांची सभा होणार आहे. मात्र सभेआधीच मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. आधी आम्हाला परवानगी दिली आणि नंतर ती रद्द करून त्याच ठिकाणी अमित शाहांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळे बच्चू कडू चांगलेच संतापले.

Abu Azmi । अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांवर अबू आझमी यांचे सर्वात मोठे वक्तव्य

त्याचबरोबर यावेळी बच्चू कडू यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. पोलिसांनी आपल्या गाडीवर भाजपचे झेंडे लावावेत, त्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं होतंय असा आरोप त्यांनी केलाय. त्याचबरोबर कायदा राखण्याचं काम करणाऱ्या पोलिसांनीच आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

Mumbai Crime । नूडल्सच्या पॅकेटमध्ये हिरे, अंडरवेअरमध्ये सोने… मुंबई विमानतळावर 4 तस्कर पकडले

Spread the love