Baramati Lok Sabha | बारामतीत धक्कादायक प्रकार! EVM ठेवलेल्या रुमचे CCTV 45 मिनिटं बंद; शरद पवार गटाकडून गंभीर आरोप

Baramati Lok Sabha

Baramati Lok Sabha | मागच्या काही दिवसापासून बारामती मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. या ठिकाणी ७ मे रोजी मतदान पार पडले आहे. मात्र तरीदेखील बारामती मतदारसंघ अजूनही चर्चेत आहे. सध्या देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती या ठिकाणी मध्यरात्री पैसे वाटण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर या आरोपांमुळे खळबळ उडाली होती.

Beed Lok Sabha Election | ब्रेकिंग! शरद पवारांच्या सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

आता या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन मुद्दा समोर आला आहे. बारामतीमधील सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स या एका गोदामातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ईव्हीएम मशीन्स असलेल्या या स्ट्राँग रुमवर सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Ahmdnagar Lok Sabha । अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ! सुजय विखे अन् लंकेंचे कार्यकर्ते मध्यरात्री भिडले; रस्त्यावर पडली पैशाची बॅग, व्हिडीओ व्हायरल

माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी या प्रकरणी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

Nashik Politics । नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले, नुसता पैशांचा पाऊस…धक्कादायक व्हिडीओ समोर

Spread the love