NCP MLA Disqualification | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट

Sharad Pawar And Ajit Pawar

NCP MLA Disqualification | शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रता प्रकरणाकडे लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होत आहे. या सुनावणीचा आज पहिला दिवस आहे. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा ट्विस्ट निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Accident News । पुण्यात ट्रकचा अतिशय भीषण अपघात, २ जण गंभीर जखमी

या सुनावणीवेळी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी झाल्या होत्या असं उत्तर दिलं. मात्र त्याची कागदपत्रे आणि पुरावे एका बंद कपाटात ठेवण्यात आले होते ते गायब झाल्याचे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

Saif Ali Khan Health Update । ब्रेकिंग! सैफ अली खानच्या तब्येतीबद्दल समोर आली सर्वात मोठी बातमी

आजच्या सुनावणी मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे ते म्हणाले, “पक्षांतर्गत निवडणूक झाली मात्र confidential कपाटात हे कागदपत्र ठेवण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कागदपत्रांची ज्या व्यक्तींकडे जबाबदारी देण्यात आली होती त्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी त्या कागदपत्रांचे म्हणजेच पुराव्याचे काय केले माहित नाही. असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारायची होती पण…’; कंगना रनौत वक्तव्य चर्चेत

त्यामुळे आता ही सुनावणी कोणत्या स्तरावर जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आता या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून लवकरच याबाबत निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Plane Crash in Mizoram । मोठी बातमी! १४ प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं, ८ जण जखमी

Spread the love