Pune Accident News । पुण्यात ट्रकचा अतिशय भीषण अपघात, २ जण गंभीर जखमी

Pune Accident News

Pune Accident News । सध्या पुण्यातून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रक चालकासह दोन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. समोरील ट्रकवर पाठीमागून ट्रक आढळल्यामुळे हा भीषण अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

Saif Ali Khan Health Update । ब्रेकिंग! सैफ अली खानच्या तब्येतीबद्दल समोर आली सर्वात मोठी बातमी

माहितीनुसार, कात्रज बायपास रस्त्यावर नवले पुलाखाली मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मालवाहतूक ट्रक आज सकाळी पहाटे कात्रजहून वारजेच्या दिशेने निघाली होती. यावेळी नवले पुलाखाली आल्यानंतर समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक समोरच्या ट्रकवर जोरात आदळला आणि हा भीषण अपघात झाला आहे.

Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारायची होती पण…’; कंगना रनौत वक्तव्य चर्चेत

या अपघातामध्ये मागच्या ट्रक मधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Plane Crash in Mizoram । मोठी बातमी! १४ प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं, ८ जण जखमी

Spread the love