Saif Ali Khan Health Update । ब्रेकिंग! सैफ अली खानच्या तब्येतीबद्दल समोर आली सर्वात मोठी बातमी

Saif Ali Khan

Saif Ali Khan Health Update । बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नाही. सोमवारी या अभिनेत्यावर ट्रायसेप शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफला बऱ्याच दिवसांपासून या समस्येचा सामना करावा लागत होता. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या वेदना तीव्र झाल्या, त्यानंतर त्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

Kangana Ranaut | ‘बागेश्वर बाबांना मिठी मारायची होती पण…’; कंगना रनौत वक्तव्य चर्चेत

काल (22 जानेवारी) सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात सैफला दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यामुळे चाहत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता सैफने स्वत: त्याच्या तब्येतीची अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Plane Crash in Mizoram । मोठी बातमी! १४ प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं, ८ जण जखमी

सैफ अली खानवर ट्रायसेप सर्जरी झाली असून आता तो पूर्वीपेक्षा बरा आहे. त्याच्या तब्येतीबद्दल अपडेट शेअर करताना सैफ म्हणाला, “ही दुखापत आणि त्यानंतरची शस्त्रक्रिया हा आमच्या कामाचा एक भाग आहे. सर्वांच्या प्रेम आणि काळजीबद्दल मी सर्व हितचिंतकांचे आभार मानतो.” यामुळे आता सैफच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

Summah Williams । 11 वर्षाच्या मुलीला आहे भयंकर आजार, तिचे स्वतःचे अश्रूही जीवघेणे; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

अभिनेत्याच्या कामाबद्दल पाहिले तर, सैफ अली खान देवरा नावाच्या साऊथ चित्रपटात काम करत आहे. त्यात त्याने बहिराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरही आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे.

Pune Fire News । ब्रेकिंग! पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आग; दोन तरुणांचा होरपळून मृत्यू

Spread the love