Gadchiroli News । गडचिरोलीमध्ये भयानक दुर्घटना! महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट नदीपात्रात उलटली; अनेक महिला बुडाल्या

Gadchiroli News

Gadchiroli News । सध्या गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी मजुरांना घेऊन जाणारी बोट नदीपात्रात बुडाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना आहे. चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली आहे.

NCP MLA Disqualification | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट

या घटनेबाबत अधिक माहिती अशी, गणपूर रै परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची तोडणीसाठी जात होत्या. नेहमीप्रमाणे आज सकाळी महिलांना नाव घेऊन जात होती. मात्र नाव नदीच्या मधोमध येताच नदीपात्रात उलटली आणि सहा ही महिला पाण्यात बुडाल्या आहेत. यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून अजून पाच महिलांचा अद्याप शोध लागलेला नाही.

Pune Accident News । पुण्यात ट्रकचा अतिशय भीषण अपघात, २ जण गंभीर जखमी

नावाड्याला पोहोता येत असल्याने तो पोहोत किनाऱ्यावर आला. तसेच एका महिलेला वाचवण्यात यश आले. परंतु सहा महिला बुडाल्या असून एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. अजून पाच महिलांचा शोध घेतला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम वेगाने सुरू केली आहे.

Saif Ali Khan Health Update । ब्रेकिंग! सैफ अली खानच्या तब्येतीबद्दल समोर आली सर्वात मोठी बातमी

Spread the love